News Flash

व्हेनेझुएलात विरोधी पक्षनेत्याची हत्या

तुरुंगात असलेल्या एका नेत्याच्या पत्नी लिलियन टिंटोरीही सभेस उपस्थित होत्या.

व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते लुईस मॅन्युअल डायझ यांची बुधवारी सायंकाळी निवडणूक प्रचार सभेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेथील निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आता तणाव निर्माण झाला आहे.

तुरुंगात असलेल्या एका नेत्याच्या पत्नी लिलियन टिंटोरीही सभेस उपस्थित होत्या. डायझ हे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे टीकाकार होते. जस्टीस फर्स्ट पक्षाचे नेते अब्राहन फर्नाडेझ यांनी सांगितले, की लुईस गोळ्या लागून रक्ताच्या थारोळ्यात पडले. डेमोक्रॅटिक अ‍ॅक्शन पार्टीचे हेन्ही रामोस अलुप यांनी सांगितले, की डायझ यांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या. टिंटोरी यांनी शेजारच्या दुकानात आसरा घेतला. मादुरो यांचा या निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता वर्तवली असून नॅशनल असेंब्लीसाठी ६ डिसेंबरला निवडणुका होत आहेत. त्यामुळे अध्यक्षांची सत्तेवरील पकड सैल होत चालली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 12:06 am

Web Title: venezuela opposition leader shoot
टॅग : Opposition Leader
Next Stories
1 वायएसआर काँग्रेसच्या खासदाराविरोधात गुन्हा
2 शाही लग्नसोहळा : आठ एकर जागेत पार पडलेल्या लग्नसोहळ्याचा खर्च ५५ कोटी
3 आंबेडकरांच्या योगदानामुळे भारताचे संविधान सामाजिक दस्तावेज – पंतप्रधान
Just Now!
X