News Flash

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांची सुटका

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेश सरकारने तातडीने विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांची सोमवारी दुपारी सुटका केली.

| August 26, 2013 05:41 am

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांची सुटका

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेश सरकारने तातडीने विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांची सोमवारी दुपारी सुटका केली. २४ तासांपेक्षा जास्त वेळ अटकेत ठेवण्यात आले असेल, तर सिंघल यांच्यासह प्रवीण तोगडिया, जगदगुरू रामभद्राचार्य यांची सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दुपारी दिले होते. त्यानंतर काही वेळातच सिंघल यांची सुटका करण्यात आली. 
विश्व हिंदू परिषदेच्या परिक्रमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी सिंघल यांना लखनौ विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रवीण तोगडिया यांनाही अयोध्येतून ताब्यात घेण्यात आले होते.
… तर अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया यांची तातडीने सुटका करा – उच्च न्यायालय 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2013 5:41 am

Web Title: vhp leader ashok singhal released up police
टॅग : Ashok Singhal
Next Stories
1 … तर अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया यांची तातडीने सुटका करा – उच्च न्यायालय
2 अन्नसुरक्षा विधेयकास मतभेद विसरून पाठिंबा द्या – सोनिया गांधी
3 यात्रेवरून रणकंदन