06 March 2021

News Flash

वीरभद्र सिंग हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी सहाव्यांदा विराजमान

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाबाहेर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल उर्मिला सिंग

| December 25, 2012 06:11 am

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाबाहेर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल उर्मिला सिंग यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६८ जागांपैकी ३६ जागांवर विजय मिळाला होता.
वीरभद्र सिंग यांच्या मंत्रिमंडळात सध्या १० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून या मंत्र्यांनाही मंगळवारी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या मंत्र्यांपैकी सुजनसिंग पठानिया, ठाकूरसिंग भारमौरी, मुकेश अग्निहोत्री, सुधीर शर्मा, प्रकाश चौधरी आणि धनीराम शांडिल या वीरभद्र सिंग यांच्या समर्थकांचा समावेश आहे तर विद्या स्टोकस, कौलसिंग ठाकूर आणि जी. एस. बाली या त्यांच्या विरोधकांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
हिमाचल काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे ७८ वर्षीय वीरभद्र सिंग यांना पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत पक्षाने भरभरुन दिले असून मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त सात वेळा आमदार, पाच वेळा खासदार आणि पाच वेळा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशी जवळपास सर्व पदे त्यांनी उपभोगली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 6:11 am

Web Title: virbhadra singh sworn in as himachal cm for a record 6th time
Next Stories
1 अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2 महिला कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास ढासळला
3 ‘क्षोभ रास्त, मात्र हिंसा अयोग्य!’
Just Now!
X