News Flash

पुतिनच पुन्हा रशियाचे अध्यक्ष

७३.९ टक्के मतांच्या फरकाने विरोधकांवर एकतर्फी विजय

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

रशियामध्ये रविवारी अध्यक्ष निवडीसाठी मतदान पार पडले. यांत रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत सहभागी होते. परंतु गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी तब्बल ७३.९ टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे. पुतिन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकुमशाह असे म्हटले जाते. आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता, असे दावे रशियातील राजकीय तज्ज्ञांनी केले होते. परंतु पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 4:41 am

Web Title: vladimir putin set to win russian presidential election
Next Stories
1 आसियान देशांच्या बैठकीत आँग सान स्यू की यांच्यावर टीका
2 India vs Bangladesh T20 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताने मिळवला विजय
3 ‘जामिनावर बाहेर असलेल्यांची खोटी प्रेरणा मोहिम’; भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार
Just Now!
X