भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जाते. ५० अब्ज इतकी संपत्ती असणारे अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये १३ व्या क्रमाकांवर आहेत असं फोर्ब्सने जाहीर केलं होतं. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अंबानींहूनही श्रीमंत कुटुंबाबद्दल. आता या बातमीतल्या आकड्यांवर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण खरोखरच हे आकडे पूर्णपणे खरे आहेत. तर या कुटुंबाची दर मिनिटाची कमाई आहे ४९ लाख ७० हजार रुपये तर तासाची कमाई आहे २८.४० कोटी रुपये. याच हिशेबाने हे कुटुंब दिवसाला ७१० कोटी रुपये कमवते. इतका अवाढव्य वेगाने संपत्तीमध्ये वाढ होणाऱ्या या कुटुंबाचे नाव आहे वॉल्टन्स कुटुंब. वॉल्टमार्ट या सुपर मार्केट कंपनीची मालकी असणारं हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब असल्याचं ब्लुमबर्गने म्हटलं आहे.

वरील ओळी वाचायला तुम्हाला जर ३० सेकंद लागले असतील तर या वेळात त्यांच्या संपत्तीत २४ लाख ८५ हजार रुपयांची भर पडली आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये प्रामुख्याने पाश्चमात्य देशांमध्ये वॉलमार्टचे अनेक सुपरमार्केट्स आहेत. तिथे रोज करोडो डॉलर्सची उलाढाल होते. ब्लुमबर्गने सादर केलेल्या अहवालामध्ये जगातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. कंपनीचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची संपत्ती अब्जांमध्ये आहे. तसेच ती झपाट्याने वाढत असून संपत्तीच्या बाबतीत त्यांच्या आजूबाजूलाही कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात कुटुंब होण्याचा मान पटकावला तेव्हा वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती २,७६९ अब्ज रुपये होती. मागील दीड वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या त्यांची एकूण संपत्ती १३,५६१ अब्ज रुपये इतकी असल्याचे ब्लुमबर्गने म्हटले आहे.

अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींची संपत्ती एकूण ०.१ टक्क्यांनी वाढली आहे. श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये १९२९ नंतर सातत्याने वाढ होत असून यंदाची वाढ ही सर्वाधिक आहे. आशिया आणि युरोपमधील श्रीमंतांच्या मालकीच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे. जगातील २५ कुटुंबांकडे १.४ ट्रीयन (१ लाख ४०००० कोटी) डॉलर संपत्ती २४ कुटुंबाकडे आहे.