28 September 2020

News Flash

‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’, पंतप्रधान मोदींचा नवा नारा

वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे

संग्रहित छायाचित्र

भारताचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाने सगळयांना रोखलं आहे. करोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल, मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो. देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे. आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे.

आणखी वाचा- LAC ते LOC पर्यंत कोणीही आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही – पंतप्रधान मोदी

भारताचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाने सगळयांना रोखलं आहे. करोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- करोना लसीबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आणखी वाचा- गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याचे आवाहन

एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 8:45 am

Web Title: we have to move forward with the mantra of make for world along with make in india pm modi nck 90
टॅग Independence Day
Next Stories
1 LAC ते LOC पर्यंत कोणीही आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही – पंतप्रधान मोदी
2 आता परीक्षा कशी घेता येईल?
3 देशात २४ तासांत ६४,५५३ रुग्ण
Just Now!
X