News Flash

kim jong un : ‘या’ गोष्टींमुळे जगाला वाटतेय हुकूमशहा किम जोंग-उनची धास्ती

kim jong un : जगभरात उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांची प्रतिमा विक्षिप्त व युद्धखोर नेता अशी आहे. २०१५ साली त्यांनी खुद्द संरक्षणमंत्र्यांना तोफेच्या तोंडी

Kim Jong un : अमेरिका व संयुक्त राष्ट्रांचा विरोध डावलून अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन त्यांनी जगाच्या चिंतेत भर घातली.

kim jong un : जगभरात किम जोंग-उन यांची प्रतिमा विक्षिप्त व युद्धखोर नेता अशी आहे. सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर मंगळवारी किम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांचा विरोध डावलून अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन त्यांनी जगाच्या चिंतेत भर घातली. अमेरिकेच्या मुख्य भूमीवर डागू शकू इतक्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आम्ही विकसित केली आहेत, असा दावा किम काही दिवसांपूर्वी करत होते. त्यामुळे अमेरिकेसह, दक्षिण कोरिया, जपान हे देश अधिक चिंतेत होते अखेर नुकतीच झालेली किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट ही अनेक प्रश्न सोडवेल असा आशावाद निर्माण झालाय.

वादग्रस्त वक्तव्य, क्रुरता यांसारख्या अनेक गोष्टींमुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा जगाभरातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. या नेत्याविषयी २०११ पासून अनेक चित्रविचित्र आणि तितक्याच भयावह गोष्टी समोर आल्या आहेत. या गोष्टींचा थोडक्यात आढावा.

Donald trump Kim jong Un summit: किम जोंग उन यांचा पहिलावहिला सेल्फी बघितला का?

– किमनं आपलं शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमधून पूर्ण केलं. त्यावेळी किमची खरी ओळख लपवण्यात आली होती. पॅक उन या नावानं तो इंटरनॅशनल स्कूल ऑफ बर्नमध्ये शिकत होता. उत्तर कोरियन दूतावासातील अधिकाऱ्याचा मुलगा अशीच त्याची ओळख होती.

– किमचे नेमकं वय किती आहे, त्याचा जन्म कोणत्या साली झाला याबद्दल अजूनही मतभेद आहे. आपलं वय कमी दिसावं यासाठी त्यांनी प्लास्टिक सर्जरी करून घेतल्याचा दावा केला जातो. तसेच त्याची उंचीही कमी आहे. केवळ आपण उंच आहोत हे दाखवण्यासाठी ते कोणालाही लक्षात येणार नाही असे उंच टाचांचे बूट वापरतात असा दावा अनेक वृत्तपत्रांनी केला आहे.

North Korea : जाणून घ्या हुकूमशहा किम जोंग उनचा उत्तर कोरिया नेमका आहे तरी कसा

– किम यांच्या वडिलांचं ज्यावेळी निधन झालं त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत प्रत्येक नागरिकांवर ‘अश्रू ढाळण्या’ची सक्ती करण्यात आली होती. जे नागरिक रडले नाही किंवा ज्यांनी दु:ख व्यक्त केलं नाही त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती अशा स्वरुपाच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

– २०१४ मध्ये किम जाँग उन याने आपले काका यांग साँग थेक यांच्यावर १२० कुत्रे सोडून त्यांना ठार केल्याची बातमी जगभर वाऱ्यासारखी पसरली होती. भुकेल्या कुत्र्यांनी लचके तोडून त्यांना ठार केले. हा क्रूर खेळ किमचे शेकडो अधिकारी आपल्या डोळ्यादेखत पाहात होते असंही अनेकांनी म्हटलं होतं.

Kim Jong un bodyguards : असे निवडले जातात किम जोंग उनचे बॉडीगार्ड

– २०१५ साली किमनं संरक्षणमंत्री ह्योन योंग चोल यांना तोफेच्या तोंडी दिल्याचा गोप्यस्फोट दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेनं केला होता. सरकारी कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांचा डोळा लागला होता, त्यामुळे संतापून त्यांनी ही कारवाई केल्याचं म्हटलं आहे.

– २०१६ साली ऑलिम्पिक सामने पार पाडले होते. यात उत्तर कोरियातील जे खेळाडू अयशस्वी झाले त्यांना खाणीत काम करण्याची शिक्षा सुनावली गेल्याचा दावाही अनेक आंतरराष्ट्रीय दैनिकांनी केला होता. या खेळांडूना खरंच शिक्षा झाली होती का? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:12 pm

Web Title: weird facts about north korea leader kim jong un
Next Stories
1 Social Viral : आयुष्यात तक्रार करण्याआधी ‘या’ आजीबाईंचा व्हिडीओ पहाच
2 गुगलवर ‘धडक’च्या सर्चने नेटकरी सैराट
3 फेसबुक घेऊन येतंय चांगल्या आठवणींचा लेखाजोखा मांडणारं नवं पेज