12 December 2019

News Flash

देवयानी खोब्रागडेंच्या सुटकेसाठी ऑनलाईन याचिका

अमेरिकी कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्या सुटकेसाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी प्रयत्न सुरू केले असून

| December 23, 2013 01:30 am

अमेरिकी कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्या सुटकेसाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी प्रयत्न सुरू केले असून त्यांची या प्रकरणातून मुक्तता व्हावी यासाठी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे.
“देवयानी खोब्रागडे यांना आपल्या मुलीच्या शाळेमधून बाहेर येत असताना अटक करण्यात आली, त्यावेळी त्यांनी राजनैतिक अधिकारी असल्याचे सांगूनही
त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांची अशी मानहानी झाल्यामुळे भारतीय- अमेरिकन नागरिकांच्या भावना दुखाविल्या गेल्या आहेत. तसेच अशा घटनांमुळे भारत व अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे खोब्रागडे यांच्याविरोधातील हे प्रकरण मागे घेण्यात यावे” अशी मागणी या ऑनलाईन याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे.
खोब्रागडे, महाराष्ट्र, भारत, अमेरिका, बाबासाहेब वगैरे
देवयानी खोब्रागडे यांची आणखी मानखंडना होऊ नये असे भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता ख्रिसमस तोंडावर आल्याने सरकारी कार्यालये बंद राहणार असून, पुढील निर्णय वेगाने घडवून आणण्यात भारत सरकारची कसोटी लागणार आहे. दरम्यान, खोब्रागडे यांची न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांच्या स्थायीस्वरूपी मिशनमध्ये बदली करण्यात आली असून त्यांना राजनैतिक अधिकाऱ्याचे सर्व विशेषाधिकार बहाल करण्यात यावे अशी विनंती भारताने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यान्ंना केली आहे.
अधिकारवाढीमुळे ‘गुन्हा’ घटत नाही

First Published on December 23, 2013 1:30 am

Web Title: white house petition launched to drop charges against devyani
Just Now!
X