17 January 2021

News Flash

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात उपलब्ध होणारी लस सुरुवातीला कोणाला मिळणार? जाणून घ्या…

करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे.

लंडन : ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात जगातील करोनावरील पहिली लस उपलब्ध होणार आहे. याची माहिती देताना प्रा. वेई शेन लिम.

करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती. दरम्यान, सुरुवातीला प्रामुख्याने कोणाला ही लस दिली जाईल हे देखील लस निर्मिती प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

फायझर बायोएनटेकच्या लसीकरण योजनेच्या संयुक्त समितीतील प्रमुख प्रा. वेई शेन लिम म्हणाले, “ही लस सुरुवातीला घरातच असणारे ज्येष्ठ नागरिक आणि घरगुती काम करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्राधान्यक्रमानं देण्यात येणार आहे.”

जगाला वेठीस धरणाऱ्या करोना संकटावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. करोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनला एक आशेचा किरण दिसला आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकच्या लशीला आज परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना करोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस करोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 4:43 pm

Web Title: who will initially get the vaccine which will be available in the uk next week information provided by the authorities aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 सरकारचं स्थैर्यही महत्त्वाचं असतं; योगींचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला
2 काहीही हिसकावून घेणार नाही, ही तर खुली स्पर्धा; योगींनी मुंबईत केली फिल्मसिटीची घोषणा
3 हिंदू तरूणीशी विवाह करण्यासाठी मुस्लीम तरूणाने धर्म बदलला
Just Now!
X