19 November 2017

News Flash

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू; दोन्ही सभागृहांमध्ये बाळासाहेबांना श्रद्धांजली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना

नवी दिल्ली | Updated: November 22, 2012 12:50 PM

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.लोकसभा अध्यक्षा मीराकुमार आणि उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष डॉ. हमीद अन्सारी यांनी बाळासाहेबांनी केलेल्या भरीव कार्याची माहिती सभागृहाला देत श्रद्धांजली अर्पण केली. बाळासाहेबांच्या स्मरणार्थ सभागृहाचं कामकाज एक दिवसासाठी तहकूब करावं, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती. मात्र, सरकाराने भाजपच्या मागणीला विरोध करत कामकाजाला सुरूवात केली.
संसदेचं पावसाळी अधिवेशन कोळसा घोटाळ्यामुळे गाजलं होतं. पण आता तो मुद्दा मागे पडला असून यावेळच्या अधिवेशनात विदेशी गुंतवणुकीसारखे महत्त्वाचे विषय गाजण्याची आणि त्यावरून अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
भाजपने रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या मुद्द्यावर मतदानाची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सरकारच्या या निर्णयाविरोधच अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.

First Published on November 22, 2012 12:50 pm

Web Title: winter session of parliament begins