News Flash

ज्यानं पेट्रोलनं पेटवलं त्यालाच घट्ट धरून ठेवलं; त्याच्यासह करोनायोद्धा नर्सचा मृत्यू

८० टक्के भाजलेल्या तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला तिच्या प्रियकराने जिवंत जाळलं. या महिलेने त्यांचे प्रेमसंबंध संपवण्याची इच्छा व्यक्त केली. प्रेमात नकार दिल्याने या माणसाने तिला जाळलं. या घटनेत त्या नर्सचा होरपळून मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा या ठिकाणी ही घटना घडली. दरम्यान या नर्सच्या अंगावर जेव्हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने पेट्रोल ओतलं आणि तिला पेटवलं तेव्हा या नर्स महिलेने त्यालाही धरलं ज्यामुळे तोही ८० टक्के भाजला. या तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू जाला आहे. या घटनेत ज्या परिचारिकेचा मृत्यू झाला ती विजयवाडा येथील कोविड सेंटरमध्ये नर्स म्हणून काम करत होती.

विजयवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचा आणि तरुणीचे गेल्या चार वर्षांपासून संबंध होते. गेल्या काही महिन्यांपासून या नर्स युवतीने त्या तरुणाकडे सगळे प्रेमसंबंध संपवण्याची मागणी केली होती. तरीही हा तरुण तिचा पिच्छा पुरवत होता. या परिचारिकेवर तो तरुण लग्नासाठी दबाव आणत होता. दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी या तरुणीने विजयवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ज्यानंतर पोलिसांनी या तरुणाला समजही दिली होती. त्याच्याकडून यापुढे या तरुणीला त्रास देणार नाही असं लेखीही घेतलं होतं. ज्यानंतर या तरुणीने तिची तक्रार मागे घेतली होती.

दरम्यान सोमवारी जेव्हा ही परिचारिका कामावरुन परतत होती तेव्हा हा तरुण तिच्या जवळ पोहचला आणि तिच्याशी वाद घालू लागला. तू माझ्याविरोधात पोलिसात तक्रार का दिली होतीस या विषयावरुनही दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर राग अनावर झालेल्या या तरुणाने त्याच्याकडे असलेलं पेट्रोल परिचारिकेच्या अंगावर ओतलं आणि तिला पेटवलं. आगीत होरपळणाऱ्या तरुणीने त्यालाही घट्ट धरुन ठेवलं, तो पळून जाऊ शकला नाही. दोघंही आगीत होरपळू लागल्याने ओरडू लागले. ज्यानंतर स्थानिकांनी तिथे येऊन आग विझवली. या प्रकरणात अत्यंत गंभीर रित्या भाजलेल्या त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तो तरुण ८० टक्के भाजला होता ज्यामुळे त्याला गुंटूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 6:53 pm

Web Title: woman set on fire for rejecting mans advances pulls accused into fire both die scj 81
Next Stories
1 उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांवर ओवेसी संतापले, म्हणाले…
2 ऐकावं ते नवलच – बिहारमधील दरभंगा पोलिसांनी चौथीच्या पोराला पाठवली नोटीस …
3 क्रौर्याचा कळस – घरात झोपलेल्या तीन अल्पवयीन बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला
Just Now!
X