28 October 2020

News Flash

नवऱ्याने स्वस्त फोन दिला म्हणून तिने केली आत्महत्या­­

पतीने स्वस्त मोबाइल आणला म्हणून सदर महिला नाराज होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

भोपाळमधील एका गावात 22 वर्षाच्या एका विवाहितेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून महिलेने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सदर महिलेचे तिच्या पतीबरोबर नव्या मोबाइलवरून भांडण झाले होते. आपल्या पतीने स्वस्त मोबाइल दिला म्हणून सदर महिला नाराज होती. तिच्या पतीने तिच्यासाठी 7 हजार 500 रूपयांचा फोन आणला होता. परंतु सदर महिलेला महागातील मोबाइल हवा होता. यातून नाराज होत तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करित आहेत. दरम्यान, विवाहितेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे.

सदर विवाहिता आणि तिचा पती आर्य नगरमधील विहार कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती. तसेच त्या दोघांना एक लहान मुलगीदेखील आहे. तिचा पती हा फॅब्रिकेशनचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर महिलेला 15 हजार रूपयांचा मोबाइल हवा होता. परंतु तिच्या पतीने स्वस्तातील मोबाइल आणून दिला. त्यावरून दोघांमध्ये मोठे भांडण झाल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भांडणानंतर तिचा पती दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेला. सदर महिला आपल्या मुलीसह अन्य खोलीत झोपण्यासाठी गेली. मध्यरात्री मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर महिलेच्या पतीने दुसऱ्या खोलीकडे धाव घेतली. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या पत्नीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट मिळाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच प्राथमिक माहितीनंतर सदर महिलेने भांडणानंतर आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 5:13 pm

Web Title: woman suicide bhopal after husband gifted cheap mobile phone jud 87
Next Stories
1 पाकिस्तानी मंत्र्याने केले धोनीचा अपमान करणारे ट्विट, म्हणाला…
2 प्रवासातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने पतीचा मृत्यू, कंडक्टरने मृतदेहासोबत महिलेला खाली उतरवलं
3 एमपी, राजस्थानमध्येही भाजपा ‘हात’ मारणार; काँग्रेसला धास्ती
Just Now!
X