News Flash

धक्कादायक! महिलेला लिफ्ट दिल्यानंतर कारमध्ये सामूहिक बलात्कार

बस स्टॉपवर थांबलेल्या एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिघांनी तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

बस स्टॉपवर थांबलेल्या एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिघांनी तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. हरयाणाला जाणारी बस पकडण्यासाठी पीडित महिला बस स्टॉपवर थांबली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अजूनही फरार आहे अशी माहिती स्टेशन हाऊस अधिकारी यशपाल धामा यांनी दिली.

कैराना शहरात सामूहिक बलात्काराची ही घटना घडली. आरोपींनी पीडित महिलेला कारमध्ये लिफ्ट दिल्यानंतर तिला ते जाहानपुरा गावाजवळच्या जंगलात घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला अशी माहिती यशपाल धामा यांनी दिली.

घटनास्थळावरुन निघण्यापूर्वी आरोपींनी कोणाकडे वाच्यात केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी महिलेला दिली होती असे यशपाल धामा म्हणाले. पोलिसांकडून अटकेत असलेल्या दोन आरोपींची चौकशी सुरु असून तिसऱ्याचा शोध सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 6:20 pm

Web Title: woman waiting for bus offered lift gang raped in car uttar pradesh shamli district dmp 82
Next Stories
1 Triple Talaq: भर बाजारात तलाक…तलाक…तलाक म्हणत पळून गेला पती, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
2 उत्तर प्रदेश : योगी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच मंत्र्याचे राजीनामासत्र
3 काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना दुसऱ्यांदा जम्मू विमानतळावरुनच दिल्लीला पाठवलं
Just Now!
X