दोन हृदये तुटली.. दोन मने तुटली तर त्याचा मानवाच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. घटस्फोटानंतर स्त्रियांचे वजन २ किलोने कमी होते. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार घटस्फोटानंतर पहिल्या महिन्यातच स्त्रियांचे वजन २ किलोने कमी होते. याचा अर्थ वजन कमी करण्यासाठी कुणी नातेसंबंधाची वीण तोडून एकमेकांची मने तोडून घटस्फोट घेण्याचे मात्र कारण नाही. आहार मर्यादित व तंतुयुक्त ठेवला, नियमित चालण्याचा व्यायाम केला तर वजन कमी राहू शकते.
 प्रदीर्घ काळचे नातेसंबंध तुटले तर एका वर्षांत स्त्रियांचे वजन सरासरी सहा किलोने कमी होते. या प्रतिसादकांपैकी ४६ टक्के स्त्रियांनी सांगितले की, प्रदीर्घ काळचा विवाह किंवा नातेसंबंध तुटून घटस्फोट घेतला तर अनेक भावनिक उलथापालथी होतात, त्यामुळे खाणे कमी होते, अन्न खाण्याची इच्छा राहत नाही. किमान ४७ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की, आम्ही सुंदर दिसण्यासाठी वजन कमी केले. आहारविषयक कंपनी फोर्झा सप्लिमेंट यांनी केलेल्या पाहणीनुसार एक हजार जणांपैकी तीन चतुर्थाश म्हणजे ७७ टक्के जण एकटे असताना बारीक झाले.
दोन तृतीयांश जणांनी म्हणजे ६८ टक्के लोकांनी प्रदीर्घ नातेसंबंध तुटल्यानंतर वजन कमी झाले असल्याचे सांगितले, यात ते नाते कोण संपवते किंवा कुणाकडून संपवले जाते यावरही बरेच अवलंबून असते. स्त्रियांनी जर घटस्फोट घेतला तर त्यांचे वजन पहिल्या महिन्यात १.३ किलोने खाली येते व त्या वर्षभर एकटय़ाच राहिल्या तर ३ किलोने खाली येते.