२०१२ मधील निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही अॅप तयार करण्यात आले आहेत. ते डाऊनलोड केल्यानंतर आपण पोलीस, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रीण अशा कोणाचाही मोबाईल अथवा दूरध्वनी क्रमांक यावर रजिस्टर करू शकतो. संकटकाळात संबंधित अॅपवरील पर्यायावर क्लिक केल्यानंतर रजिस्टर क्रमांकावर आपण संकटात आहोत, असा संदेश जातो. त्यानंतर ते अॅप्लिकेशन अॅक्टीव्ह होईल. ठराविक अंतराने मोबाईलवरुन फोटो निघतील आणि ते त्या रजिस्टर क्रमांकावर पाठवले जातील. याबरोबरच हा सगळा डेटा मोबाईल क्लाऊडवरही सेव्ह होईल. त्यामुळे फोन तोडला गेला तरच हा डेटा स्टोरेजमधून काढला जाईल. अन्यथा तो कायमस्वरुपी सेव्ह राहू शकतो.

दामिनी

२०१२ मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणानंतर हे अॅप्लिकेशन तयार कऱण्यात आले. हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर आपण पोलिस, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रीण अशा कोणाचाही क्रमांक यावर रजिस्टर करु शकतो. अडचणीच्या प्रसंगी एक क्लिक केल्यावर त्या रजिस्टर क्रमांकावर आपण अडचणीत असल्याचा संदेश जातो. त्यानंतर हे अॅप्लिकेशन अॅक्टीव्ह होईल आणि ठराविक अंतराने मोबाईलवरुन फोटो निघतील आणि ते त्या रजिस्टर क्रमांकावर पाठवले जातील. याबरोबरच हा सगळा डेटा मोबाईल क्लाऊडवरही सेव्ह होईल. त्यामुळे फोन तोडला गेला तरच हा डेटा स्टोरेजमधून काढला जाईल अन्यथा तो कायमसाठी सेव्ह राहील.

damini-670

सर्कल ऑफ ६

हे अॅप्लिकेशन महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षितता ध्यानात ठेवून तयार केले आहे. त्याचबरोबर सर्व महिलांसाठीही उपयोगाचे आहे. संकटकाळात अॅपवरील पर्यायावर क्लिक केल्यास आपल्या घरच्यांना संदेश जाईल. हे अॅप्लिकेशन हिंदीमध्येही उपलब्ध असून दिल्लीतील काही हेल्पलाईन क्रमांक यावर उपलब्ध करून दिले आहेत. circle-of-6-670

स्क्रीम अलार्म

हे वेगळ्या स्वरुपाचे अॅप असून एखाद्या महिलेवर संकट ओढवले असल्यास तिला मोबाईलवरील एक बटण क्लिक करायचे आहे. त्यानंतर महिलेच्या ओरडण्याचा आवाज येईल. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना एखादी महिला अडचणीत असल्याचे समजेल. त्यामुळे हे अॅप्लिकेशन संकटात सापडलेल्या महिलेची सुटका करण्यास मदतगार ठरणार आहे.

screem-alarm-670

विथ यू

विथ यू या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून संकटकाळात महिलेला अतिशय कमी कालावधीत मदत मिळू शकते. महिलेने पॉवर बटण दाबल्यास इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या व्यक्तींना आय अॅम इन डेंजर, आय नीड हेल्प, प्लीज फॉलो माय लोकेशन असे मेसेज दर दोन मिनिटांनी जातील. एका टीव्ही शोच्या माध्यमातून या अॅप्लिकेशनची संकल्पना पुढे आली आहे.

with-you-670

सस्पेक्ट रजिस्ट्री

हे अॅप्लिकेशन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे आपले लोकेशन ट्रॅक करते. याशिवाय पॅनिक बटण दाबल्यावर आपल्या फोनमध्ये असलेल्या सर्व संपर्क क्रमांकांना एक मिनिटांची व्हीडिओ रेकॉर्डिंग पाठवली जाईल. फंक्शन चालू केल्यावर आपले फोटो, जागा आणि लोकेशनही आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड होते.

suspect-registry-670

वुमेन्स सेफ्टी अॅप
या अॅप्लिकेशनमध्ये शेक आणि हॅंड असे फिचर आहेत. हे चालू करुन फोन थोडा शेक केल्यास आपली संपूर्ण माहिती मोबाईलमधील संपर्क क्रमांकांवर पाठवली जाईल. या अॅपच्या माध्यमातून विनाकारण मेसेज पाठवला जाऊ नये म्हणून आपण सेटींग्जमधून शेकच्या पर्यायाला नियंत्रित करु शकतो.

women-seafty-670