11 August 2020

News Flash

‘मी गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता’

भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे

भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटकातील आमदाराने आपण केंद्रीय गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता असं वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे. बसनगौडा पाटील यतनाल असं या आमदाराचं नाव आहे. बसनगौडा पाटील हे विजयपुरा मतदारसंघातील आमदर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी बुद्धिजीवी आणि उदारमतवादी देशविरोधी असल्याचंही म्हटलं आहे.

‘बुद्धिजीवी या देशात राहतात, आपण ज्यासाठी कर भरतो त्या सर्व सुविधांचा लाभ घेतात. यानंतर आपल्या लष्कराविरोधात घोषणा देतात. आपल्या देशाला यांच्यापासून सर्वात जास्त धोका आहे. जर मी केंद्रीय गृहमंत्री असतो तर यांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता’, असं बसनगौडा पाटील यतनाल बोलले आहेत.

बसनगौडा पाटील यतनाल याआधीही एकदा वादात अडकले होते जेव्हा त्यांनी स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांना मुस्लिमांना मदत न करण्यास सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 9:23 am

Web Title: would have order to shoot intellectuals says bjp mla basanagouda patil yatnal
Next Stories
1 अबू सालेम ‘संजू’ला कोर्टात खेचणार
2 आमच्या ‘मुल्क’शी असलेलं नातं सुधारण्यात तुम्हाला यश मिळो- ऋषी कपूर
3 ‘गुलछबू’ इम्रान खानला नवा पाकिस्तान घडवता येईल का? – शिवसेना
Just Now!
X