भारताने येमेनमधून भारतीय व्यक्तींना हवाई मार्गाने भारतात आणण्यास सुरुवात केली असून एअर इंडियाचे पहिले विमान येमेनची राजधानी सना येथे उतरले आहे.
भारताने राजनैतिक प्रयत्न करून सना येथे विमान उतरवण्यास परवानगी मिळवली व पहिले विमान १२० प्रवाशांना घेऊन भारतात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, येमेनमध्ये २५०० लोक अजूनही अडकून पडले आहेत व ते सुटकेची वाट पाहात आहेत.
प्रवक्तयाने सांगितले की, विमांची चार उड्डाणे एअर इंडिया आजच करणार असून ५०० नागरिकांना भारतात आणणार आहे. काही भारतीयांना अगोदर दिजबौतीला आणले गेले व नंतर हवाई दलाच्या विमानांनीही त्यांना भारतात आणले, परराष्ट्र राज्यमंत्री दिजबौतीला गेले असून ते मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. भारताने १८० प्रवासी क्षमतेची दोन विमाने ३० मार्चला मस्कतला पाठवली होती पण ती विमाने येमेनच्या शहरात उतरू शकली नव्हती कारण त्यांना परवानगी मिळाली नव्हती, असे परराष्ट्र प्रवक्तयाने सांगितले.