23 April 2019

News Flash

मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ नरमले; रामदेव बाबांचा टोला

१५ वर्षांपूर्वी योगी आदित्यनाथ यांची जी शान होती त्यामध्ये आता खूप फरक पडला आहे.

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath along with yog guru Baba Ramdev and Yogi Bharat Bhushan at Uttar Pradesh Yog Mahotsav Progrramme in Lucknow : योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी लखनऊ येथील योग महोत्सवात नमाज पठण आणि सूर्य नमस्काराची पद्धत एकसमान असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली असून आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा मौलवींनी निषेध केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ नरमले आहेत, असा खोचक टोला बाबा रामदेव यांनी लगावला आहे. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी लखनऊ येथे सुरू असलेल्या योग महोत्सवात सूर्यनमस्कार आणि नमाजात साम्य असल्याचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि आता तुम्हीच सूर्यनमस्कार आणि योगक्रियेत साम्य आहे किंवा नाही, ते ठरवा असे म्हटले. हे विधान करून बाबा रामदेव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मताशी अप्रत्यक्षपणे असहमती दर्शवली. तसेच योगी आदित्यनाथ पूर्वीच्या तुलनेत मवाळ झाल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. १५ वर्षांपूर्वी योगी आदित्यनाथ यांची जी शान होती त्यामध्ये आता खूप फरक पडला आहे. तेव्हा ते जास्त आक्रमक होते, असे सूचक वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.

नमाज पठण आणि सूर्य नमस्काराची पद्धत एकच- योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी लखनऊ येथील योग महोत्सवात नमाज पठण आणि सूर्य नमस्काराची पद्धत एकसमान असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली असून आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा मौलवींनी निषेध केला आहे. ज्या प्रमाणे सूर्यनमस्कारात आसने असतात, तशीच आसने ही नमाजातही असतात. तर सूर्यनमस्कारात जसे प्राणायाम असतात तसेच श्वसनाचे प्रकारही नमाजमध्ये असतात. दोन्ही प्रक्रिया समानच आहेत परंतु हिंदू-मुस्लिमांनी त्यामध्ये साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न केला नसल्याचे ते म्हणाले. २०१४ च्या पूर्वी योगाबदद्ल फारसे बोलले जात नसे पंरतु नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून योगाचा जगभर प्रसार झाला आहे. त्यांनी योगाला जगभर मान्यता मिळवून दिली असल्याचे ते म्हणाले. योगाचे सामर्थ्य तुमच्या लक्षात आलेच असेल असे देखील ते म्हणाले. लोक योग्याला भीक सुद्धा घालत नाही परंतु नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील जनतेने तर माझ्या हाती राज्यच दिल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला योगगुरू रामदेव बाबा हे देखील हजर होते.

First Published on March 30, 2017 11:33 am

Web Title: yogi adityanath and baba ramdev at yoga mahotsav surya namaskar namaz