News Flash

लोकांना शांततेत जगू द्या! अयोध्येत पूजेची संमती मागणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

पूजेची संमती मागणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे

संग्रहित

अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या जागेवर पूजा करण्याची संमती मागण्यांनी देशाला शांततेत जगू द्यावं अशा शब्दात फटकारत सुप्रीम कोर्टाने पूजेची संमती मागणारी याचिका फेटाळली आहे. तुम्हाला देशात शांतता राखायची नाही का? असा प्रश्न विचारत चीफ जस्टिस रंजन गोगोई यांनी याचिकाकर्त्यांना संमती नाकारली आहे.

याआधी खालच्या कोर्टातही ही याचिका नाकारली गेली आहे. दोनवेळा याचिका नाकारली गेल्यानंतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यानंतर सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळत तुम्हाला या देशात शांतता नको का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच ही याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे.

8 मार्चला झालेल्या सुनावणीत रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाचे प्रकरण मध्यस्थांकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली असून यात न्या.एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. आठ आठवड्यात समितीनी प्रक्रिया पूर्ण करावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान रामनवमीच्या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमी भागात पूजा करण्यास संमती मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना झापत तुम्हाला देशात शांतता नको का? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 2:50 pm

Web Title: you will not let this country remain in peace sc junks plea to perform puja in ayodhya
Next Stories
1 पेंटागॉननं घेतली भारताची बाजू; अवकाशातून धोका असल्यामुळेच केली असणार A-Sat चाचणी
2 ‘डोअर बेल बंद आहे, जोरात मोदी.. मोदी.. ओरडा’; नकोशा उमेदवारांना टाळण्यासाठी भन्नाट शक्कल
3 मोदींच्या नगरमधील सभेत काळ्या कपड्यांवर बंदी… बनियान, सॉक्स काढायला सांगून दिला प्रवेश
Just Now!
X