घराच्या शेजारी राहणाऱया अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला स्वतःच्या खोलीतील कपाटात बंद करून ठेवल्याची घटना उघडकीस आली. हैदराबादमधील कुतबुल्लापूरमध्ये ही घटना घडली.
चॉकलेटच्या आमीषाने आरोपी बबलू (वय २६) याने त्याच्या घराशेजारी राहणाऱया एका नऊ वर्षांच्या मुलीला स्वतःच्या खोलीत नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर बबलूने तिला स्वतःच्या कपाटात बंद करून तेथून पलायन केले. मुलगी खूप वेळ सापडत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी संशयावरून बबलूच्या घरात प्रवेश केला. तिथे कपाटात कोणीतरी बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कुलूप तोडून मुलीला बाहेर काढले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.