केरळमधील गाजलेल्या सूर्यनेल्ली बलात्कार खटल्यातील ३१ आरोपींना केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या आरोपींनी गेल्या महिन्यात दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती के. टी. शंकरन आणि एम. एल. जोसेफ फ्रान्सिस यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. १९९६ मधील हे प्रकरण असून ३१ जणांनी एका १६ वर्षीय मुलीवर अनेक दिवस बलात्कार केला होता. त्यानंतर या मुलीने आपल्या आईसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आतापर्यंत ३१ जणांना अटक करण्यात आली असून त्या व्यतिरिक्त धर्मराजन या प्रमुख आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंगातून पलायन केलेल्या धर्मराजनला नुकतेच कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आले. या वासनाकांडात राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरीयन हेही सामील होते, त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या पीडित मुलीने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती, कुरीयन यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2013 रोजी प्रकाशित
‘सूर्यनेल्ली’प्रकरणी आरोपींना जामीन
केरळमधील गाजलेल्या सूर्यनेल्ली बलात्कार खटल्यातील ३१ आरोपींना केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या आरोपींनी गेल्या महिन्यात दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती के. टी. शंकरन आणि एम. एल. जोसेफ फ्रान्सिस यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. १९९६ मधील हे प्रकरण असून ३१ जणांनी एका १६ वर्षीय मुलीवर अनेक दिवस बलात्कार केला होता. त्यानंतर या मुलीने आपल्या
First published on: 22-03-2013 at 03:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%86%e0%a4%b0