इराक व सीरियात इसिस या संघटनेसाठी अमेरिकेतील काही व्यक्ती लढत आहेत, असे पेंटॅगॉनच्या प्रवक्तयाने सांगितले.
अमेरिकी गुप्तचर विभागाने सांगितले की, युरोपमधील किमान १००० जण सीरियात अतिरेक्यांच्या बाजूने लढत आहेत. एक अमेरिकी नागरिक जिहादी लढाईत मारला गेला आहे. किमान १०० अमेरिकी नागरिक सीरियात लढत आहेत, पण ते नेमके कुठल्या बंडखोर गटाबरोबर सीरियात लढत आहेत असे कर्नल स्टीव्हन वॉरेन यांनी सांगितले.
आमच्या मते इसिसबरोबर काही अमेरिकी लढत असावेत. वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाश्चिमात्य पासपोर्ट असलेले काही परदेशी लोक  सुन्नी अतिरेक्यांच्या बाजूने लढत आहेत. युरोप व अमेरिका या देशांवर अतिरेकी हल्ले करण्यास त्यामुळे सोपे जाऊ शकते.
एफबीआयने अमेरिकेतून सीरियात जिहादी लढाईसाठी जाणाऱ्या काही जणांना अटक केली आहे असे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक मॅथ्यू ऑसलेन यांनी सांगितले.
इसिस अमेरिकेवर हल्ला करण्याचे कुठलेही ठोस संकेत मिळत नाहीत पण अमेरिकेवर ते मर्यादित हल्ले करू शकतात असे ते म्हणाले.