गेल्या २४ तासात १२२९ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण देशभरात आढळले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत ६८६ जणांचा मृत्यू देशभरात झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

२१ हजार ७०० रुग्णांपैकी आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ३ मेपर्यंत हा लॉकडाउन असणारच आहे. २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. त्यानंतर लॉकडाउन वाढवायचा की नेमकं काय करायचं याचं धोरण ठरवलं जाण्याची शक्यता आहे.

देशभरात करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. रुग्ण आढळताच तो भाग सील करण्यात येतो. देशभरात सर्वधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातही आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाय योजना केल्या जात आहेत.