दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्य़ातील वर्दळीच्या बाजारात केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन अल्पवयीन मुलींसह किमान १४ जण जखमी झाले. मुख्य बाजारपेठेचे शहर असलेल्या शोपियान येथे अतिरेक्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड फेकले. मात्र या ग्रेनेड्सचे लक्ष्य चुकले आणि त्यांचा एका वर्दळीच्या ठिकाणी स्फोट झाला. यात १४ जण जखमी झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दोन अल्पवयीन मुलींसह या जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 injured in kashmir grenade explosion
First published on: 10-05-2015 at 03:12 IST