दिल्लीतील मुनिरका भागात शनिवारी जमिनदाराच्या मुलाने एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विकी नावाच्या या आरोपीला अटक झाली असून, दिल्लीतील वसंत विहार पोलीस ठाण्यात बालकांसाठीच्या लैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायद्यातंर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील पिडीत मुलगी शुक्रवारी रात्री खरेदीसाठी बाहेर पडली असता घराजवळच असणा-या रूग्णालयाच्या परिसरातील एका खोलीत नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेनंतर पिडीत तरुणीवर सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
दिल्लीत जमिनदाराच्या मुलाकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
दिल्लीतील मुनिरका भागात शनिवारी जमिनदाराच्या मुलाने एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published on: 08-02-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 year old girl raped by landlords son in south delhi locality