Meerut Murder Case : सध्या सुरू असलेल्या कावड यात्रेमध्ये एक भाविक चक्क सौरभ राजपूतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कावड घेऊन प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत याची काही दिवसांपूर्वी पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या केली होती. भगवान शंकराचा भक्त असलेला १६ वर्षीय शिवम निळ्या ड्रममधून गंगेचं पाणी असलेल्या कावड खांद्यावर घेऊन जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे.

सौरभ राजपूत याची त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियर साहिल शुक्ला यांनी हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे करून सीमेंटसह एका निळ्या ड्रममध्ये भरले होते. पण कालांतराने ही बाब समोर आली.

न्यूज रिपोर्ट्सनुसार, शिवम याने सौरभ राजपूत याच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी मुक्ती संकल्प घेतला आहे. तो निळ्या ड्रममध्ये १०१ लिटर गंगाजल घेऊन येणार आहे. तो कावड घेऊन गाजियाबादहून हरिद्वारपर्यंतचा प्रवास करणार आहे.

कावड यात्रा ही दरवर्षी काढली जाते, यामध्ये श्रावण महिन्यात भगाव महादेवाचे हजारो भक्त सहभागी होतात. जे गंगेचे पाणी घेऊन या यात्रेत सहभागी होतात. त्यानंतर हे पाणी त्यांच्या-त्यांच्या गावात भगवान शंकराला वाहिले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेरठ येथील सौरभ राजपूत याच्या हत्तेचे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजले होते. ही हत्या ४ मार्च रोजी मेरठच्या ब्रम्हपुरी भागात झाली होती. राजपूत हा लंडनहून त्याच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता. पण त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिच्या बॉयफ्रेंडने मिळून त्याचे तुकडे केले, त्यानंतर ते तुकडे एका निळ्या ड्रममध्ये भरून त्यामध्ये सीमेंट ओतले. ही हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी राजपूत याच्या शरिराचे कुजलेले तुकडे आढळून आले होते. १८ मार्च रोजी जेव्हा राजपूतचा भाऊ ब्रह्मपुरीतील इंद्रनगर-२ येथील त्याच्या भाड्याच्या घरी गेला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले होते.