ओदिशात २००८ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी कंधमाळ जिल्ह्य़ात जोगिणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात येथील न्यायालयाने सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली, तर तीन जणांना दोषी ठरविले. जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती ज्ञानरंजन पुरोहित यांनी संतोष पटनाईक ऊर्फ मितुआ आणि गजेंद्र दिगल आणि सरोज बाहदेई यांना दोषी ठरविले. त्यांना लवकरच शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. या प्रकरणातील अन्य सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.कंधमाळ जिल्ह्य़ातील बालीगुडा येथे २५ ऑगस्ट २००८ रोजी एका जोगिणीवर बलात्कार करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे नेते लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या करण्यात आल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीत ३८ जण ठार झाले होते.
आपल्यावर हल्ला करून सामूहिक बलात्कार करण्यात आला, इतकेच नव्हे तर दोन दिवसांनी आपली अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली, असा आरोप जोगिणीने केला होता. या खटल्याची सुनावणी २०१० मध्ये सुरू झाली होती.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला ११ वर्षांच्या सश्रम कारावसाची तर अन्य दोन आरोपींना २६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
ओदिशा – जोगिणी बलात्कारप्रकरण : तीन दोषी, सहा निर्दोष
ओदिशात २००८ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी कंधमाळ जिल्ह्य़ात जोगिणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात येथील न्यायालयाने सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली, तर तीन जणांना दोषी ठरविले.
First published on: 15-03-2014 at 12:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2008 kandhamal nun gang rape case 3 people convicted 6 acquitted