संघ आणि भाजपाच्या विचारधारेला हरवण्याचा काँग्रेसच्या बैठकीत ठराव

तब्बल ५८ वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

संघ आणि भाजपा या दोन्हींच्या विचारधारेला हरवायचं आहे असा संकल्प काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सोडण्यात आला. भाजपा आणि संघाचं राजकारण आणि त्यांची विचारधारा द्वेष पसरवणारी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला या विचाराधारेचाच पराभव करायचा आहे. असा ठराव या बैठकीत करण्यात आला.

एक दोन नाही तब्बल ५८ वर्षांनी गुजरामध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये पार पडते आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी या बैठकीसाठी हजर आहेत.

गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी ही बैठक पार पडते आहे. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, महासचिव प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेते हजर आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.ही बैठक संपल्यानंतर गांधनगर या ठिकाणी रॅलीही काढली जाणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2019 congress cwc meeting in gujarat priyanka gandhi first speech in presence of sonia and rahul gandhi