Dogs Killed in Telangana News : तेलंगणा येथे मुक्या प्राण्यांवर अत्याचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील संगारेड्डीच्या एडुमैलाराम गावात ४० फुट उंच पुलावरून पाय व तोंड बांधून फेकल्याने २१ कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर गंभीर अवस्थेत असलेल्या ११ कुत्र्यांना वाचवण्यात आले आहे. या प्रकरणी सिटिझन्स फॉर अॅनिमल्स संस्थेच्या स्वयंसेवकांनी तक्रार दिल्यानंतर इंद्रकरण पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

पुलाखालून गंभीर अवस्थेत सापडलेल्या कुत्र्यांना या परिसरातल्या एका पुलावरून फेकून देण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या कोणत्याही गोष्टीची पुष्टी झालेले नाही. या घटनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी परिसरातील रहिवासी यांची चौकशी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. घटनेबद्दल पुरावे गोळा करण्यासाठी मृत कुत्र्‍यांचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशा माहिती इंद्रकरण पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकार्‍याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली.

४ जानेवारी रोजी सिटीझन्स फॉर अॅनिमल या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला एका अज्ञात व्यक्तीने या घटनास्थळी रडण्याचा आवाज येत असल्याबद्दल कळवल्यानंतर ही घटना उजेडात आली होती.

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या या संस्थेचे स्वयंसेवक पृथ्वी पनेरू यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, घटनास्थळावर पोहोचल्यावर आम्हाला एक भयानक दृश्य दिसलं. जिवंत कुत्रे हे इतर कुत्र्यांच्या कुजलेल्या मृतदेहांमध्ये आढळून आले, त्यापैकी काही कुत्र्यांना मॅग्गॉटचा प्रादुर्भाव झाला होता. काही मृतदेह तेथे साचलेल्या पाण्यात तरंगत होते, त्यानुसार ही कुत्र्यांना फेकून बरेच दिवस झाल्याचे दिसून येत होते.

हेही वाचा>> ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, टीमने तात्काळ बचावकार्य करण्यास सुरूवात केली परंतु डंपिंग साइटच्या खोलीमुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. आम्ही ॲनिमल वॉरियर्स कॉन्झर्व्हेशन सोसायटी (AWCS) आणि पीपल फॉर ॲनिमल्स (PFA) हैदराबाद यांच्याकडून मदत मागितली. तासाभराच्या प्रयत्नानंतर ११ जखमी कुत्र्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना नागोले येथील पीएफए ​​शेल्टर येथे नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत, असेही पृथ्वी यांनी सांगितले. अॅनिमल वेल्फेअर संघटनांना या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.