कन्सास शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनात तीनजणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. स्थानिक रुग्णालयाच्या प्रवक्तीने सांगितले की, एका पंधरा वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. ओव्हरलँड पार्क शहराचे प्रवक्ते सीन रेली यांनी सांगितले की, ग्रेटर कन्सास सिटी येथील परिसरात ज्यू कम्युनिटी सेंटर येथे दोनजणांचा गोळीबारात मृत्यू झाला व शालोम खेडय़ात वृद्धाश्रमात गोळीबार करण्यात आला त्यात एक ठार झाला. ओव्हरलँड पार्क अग्निशमन विभागाचे प्रवक्ते जॅसन ऱ्होड्स यांनी सांगितले की, काल दुपारी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
ओव्हरलँड पार्क वैद्यकीय केंद्राच्या प्रवक्तया ख्रिस्तीन हॅमले यांनी सांगितले की, ज्यू समाज केंद्रातील हल्ल्याच्या ठिकाणाहून एका १५ वर्षांच्या उमेदवाराला उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अनेक एकरच्या जॉन्सन परगण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्यू समाज केंद्रात केसी सुपरस्टार स्पर्धा होणार होती त्यासाठीचे ऑडिशन रद्द करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2014 रोजी प्रकाशित
अमेरिकेतील गोळीबारात तीन ठार
कन्सास शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनात तीनजणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. स्थानिक रुग्णालयाच्या प्रवक्तीने सांगितले की, एका पंधरा वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
First published on: 15-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 dead in kansas city shooting kkk link alleged