3 Lashkar terrorists behind Pahalgam attack killed : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान २६ जाणांची हत्या करण्यात आली होती, त्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
२८ जुलै रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन महादेवमध्ये लष्करचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी मतदार ओळखपत्र, कराची येथे तयार झालेले चॉकलेट आणि बायोमेट्रीक रेकॉर्ड्स असलेली मायक्रो-एसडी चिप सापडली आहे. यावरून हे तीनही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इतकेच नाही तर पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी सापडलेल्या शेल कव्हर्सचे बॅलिस्टिक विश्लेषण देखील दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या AK-47 रायफल्सवरील स्ट्रायशन मार्क्सशी (striation marks) जुळले, ज्यामुळे २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हत्याकांडात हे तिघेही सहभागी होते हे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीनंतर उघड केलेल्या पुरव्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्याला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी २८ जुले रोजी श्रीनगरच्या दाचिंगम भागात राबवलेल्या ऑपरेशन महादेवमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे.
सुरक्षा यंत्रणांनी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये सुलेमान शहा हा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार आणि मुख्य शूटर असल्याचे सांगितले आहे. अबू हमजा अफगानी हा दुसरा गोळीबार करणारा, तर यासिर उर्फ जिब्रान हा तिसपा शूटर होता.
सुलेमान शाह आणि अबू हमजा यांच्या मृतदेहाजवळ पाकिस्तान निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दोन लॅमिनेटेड मतदार ओळखपत्र स्लिप सापडल्या आहेत
या मतदार कार्डवरील सिरीयल नंबर हे लाहोर (एनए-१२५) आणि गुजरांवाला (एनए-७९) येथील मतदार यादीतील असल्याचे आढळून आले आहे.
इतकेच नाही तर एका खराब झालेल्या सॅटेलाईट फोनमधून एक मायक्रो-एसटी कार्ड सापडले आहे, ज्यामध्ये तीनही दहशतवाद्यांचे एनएडीआरए (पाकिस्तानची नॅशनल सिटीझन रजिस्ट्री) बायोमेट्रीक रेकॉर्ड आढळले आहेत, ज्यामुळे हे पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे.
मिळालेल्या डेटामध्ये त्यांच्या बोटांचे ठरे, फेशियल टेम्प्लेट्स आणि फॅमिली ट्री रेकॉर्ड इत्यादी आढळून आले आहे. त्यांचा नोंदणीकृत पत्ता हा चांगा मांगा (कसूर जिल्हा) आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील रावलकोट जवळील कोइयान गाव असा आढळून आला आहे.
याबरोबरच ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे आढळून आलेल्या वस्तूंमध्ये ‘कँडीलँड’ आणि ‘चोकोमॅक्स’ चॉकलेटचे रॅपर (हे दोन्ही ब्रँडचे उत्पादन कराचीमध्ये होते) सापडले आहेत, ज्यामुळे हे पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहलगाम हल्ल्याशी संबंध
फॉरेन्सिक आणि बॅलेस्टिक विश्लेषणातून पुष्टी झाली आहे की पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी निष्पाप लोकांची हत्या करणारे हेच तीन जण होते.
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी सापडलेल्या ७.६२x३९ एमएम शेल केसिंगचे विश्लेषण केले असता ते दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या एके-४७ रायफल्सवरील स्ट्रायशन मार्क्सशी जुळून आले आहे .
इतकेच नाही तर पहलगाममध्ये फाटलेल्या शर्टवर सापडलेल्या रक्तातून मिळवलेल्या मायटोकॉन्ड्रियल प्रोफाइल दाचीगाममध्ये सापडलेल्या तीन मृतदेहांच्या डीएनएशी जुळणारे होते.
कधी काय घडलं?
दहशतवाद्यांच्या हलचालींचा मागोवा देखील गुप्तचर यंत्रणांनी काढला आहे. या तीन जणांनी मे २०२२ मध्ये नियंत्रण रेषेच्या जवळ गुरेज शेक्टरमधून घुसखोरी केली. गुप्तचर यंत्रणांनी त्यांचे पाकिस्तानातून झालेला त्यांचा पहिला रेडिओ-इन पकडल्यानंतर याची पुष्टी झाली होती.
२१ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हे बैसरण पासून २ किमी अंतरावर असलेल्या हिल पार्कमधील हंगामी झोपड्यांमध्ये गेले.
हे त्यांनी दोन स्थानिक कश्मीरी परवैज आणि बशिर अहमद यांच्या मदतीने केले, या दोन्ही काश्मीरी स्थानिकांनी रात्री त्यांना आसार आणि जेवण दिल्याचे मान्य केले आहे.
२२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता या दहशतवाद्यानी बैसरण येथे पर्यटकांवर गोळीबार केला आणि ते दाचीगाम येथील घणदाट जंगलात पळून गेले.
सुलेमान शाहच्या गार्मिन घड्याळातून जीपीएस कॉर्डिनेट्स मिळाले आहेत, जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या फायरिंग पोजिशनशी अचूकपणे जुळतात.