आंध्र प्रदेशातील सत्तारूढ काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याच्या वृत्तावर प्रदेशाध्यक्ष बी. सत्यनारायण यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. काही मंत्र्यांसह जवळपास ३० आमदार पक्ष सोडून अन्य पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे ते म्हणाले.
अन्य पक्षात जाण्याची इच्छा असलेल्या आमदारांची जिल्हानिहाय माहिती आमच्याकडे आहे. जे मनाने दुबळे आहेत आणि ज्यांना सत्तेची लालसा आहे ते काँग्रेस सोडण्याच्या प्रयत्नांत आहेत. ते आता पक्ष कधी सोडतात इतकाच सोपस्कार राहिला आहे, असे बी. सत्यनारायण म्हणाले. दलबदलूंनी पक्ष सोडणेच हितकारक आहे, असेही ते म्हणाले.