Crime News : बंगळुरु या ठिकाणी विजय कुमार नावाच्या माणसाची हत्या झाली. या हत्येच्या प्रकरणाने एक धक्कादायक वळण घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्या प्रकरणाचा आरोप त्याचा बालपणीचा मित्र धनंजय उर्फ जयवर आहे. विजय कुमारची पत्नी आशा आणि जय यांचे विवाहबाह्य संबंध होते. आशा आणि धनंजय या दोघांनी मिळून विजय कुमारची हत्या केली असा संशय पोलिसांना आहे. या दोघांना विजय कुमारने आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं. तसंच या दोघांचे फोटोही विजय कुमारला सापडले होते. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
३० वर्षांपासून विजय आणि धनंजयची मैत्री
विजय आणि धनंजय हे दोघंही तीस वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. मगदी या ठिकाणी दोघंही शाळेतही एकत्र होते. या दोघांची घट्ट मैत्री होती. दहा वर्षांपूर्वी विजय कुमार आणि आशा यांचा विवाह झाला होता. आता धनंजयने विजयच्या पत्नीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधातून धनंजयने विजयची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कुमारने धनंजय आणि आशा यांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं. त्यानंतर त्या दोघांचे काही फोटोही विजय कुमारच्या हाती लागले होते. यानंतर विजय कुमारने आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. पत्नी आशाला घेऊन तो माचोहल्ली येथील कडाबागेरे या ठिकाणी भाडे तत्त्वावर घर घेऊन राहू लागला. तरीही धनंजय आणि आशा यांचे विवाहबाह्य संबंध कायम राहिले. यानंतर विजय कुमारचा धनंजयने काटा काढला.
हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?
विजय कुमारची हत्या झाली त्या दिवशी विजय कुमार संध्याकाळपर्यंत घरीच होता. त्यानंतर तो बाहेर गेला. ज्यानंतर काही वेळात माचोहल्लीच्या डी ग्रुप लेआऊट भागात त्याचा मृतदेह मिळाला. पोलिसांना हा संशय आहे की आशा आणि धनंजय यांनी कट रचून विजय कुमारची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात आशाला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरु केली आहे. तर धनंजय हा या घटनेनंतर फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.