येथील मनोरुग्णालयामध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये ३८ जण ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे रामेन्स्कोई विभागामध्ये असलेल्या एकमजली रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी रशियाई वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३८ जण ठार झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयामध्ये रुग्ण व वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण ४१ जण होते. दोन परिचारिकांनी या आगीमधून तीन रुग्णांना बाहेर काढले. मृतांमध्ये बहुतांश रुग्णच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2013 रोजी प्रकाशित
रशियामध्ये मनोरुग्णालयातील आगीत ३८ ठार
येथील मनोरुग्णालयामध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये ३८ जण ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे रामेन्स्कोई विभागामध्ये असलेल्या एकमजली रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी रशियाई वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
First published on: 27-04-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 38 killed in fire broken in mental hospital in russia