इराणी तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले आहे. उत्तर इराणमधील आंदोलनात सहभागी ४५० जणांना गेल्या १० दिवसांमध्ये अटक करण्यात आल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी प्रसारित केले आहे. बहुतांश सुधारणावादी कार्यकर्ते, पत्रकार आणि शेकडो आंदोलकांना रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.

विश्लेषण: रस्त्यावर उतरून महिलांनी स्वतःचे केस कापले, हिजाब जाळले; इराणमध्ये नेमकं घडतंय काय?

इराणच्या मझंदरान प्रातांतून या आंदोलकांना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील मोहम्मद करिमी यांनी ‘आयआरएनए’ या वृत्त संस्थेशी बोलताना दिली आहे. या आंदोलनकर्त्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला चढवत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले. हे आंदोलनकर्ते क्रांतीविरोधी एजंट असल्याचे करिमी यांनी म्हटले आहे.

इराणी महिला खमक्या आहेत, त्या भविष्य घडवत आहेत…

इराणमधील गश्त-एरशाद (संस्कृतीरक्षक पोलिसांनी) महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला हिजाब नीट परिधान न करण्यावरून अटक केली होती. अटकेच्या पश्चात अचानक या तरुणीची प्रकृती खालावली आणि ती कोमात गेली. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान अमिनीचा मृत्यू झाला. कट्टरपंथीय संस्कृती रक्षकांनीच अमिनीचा जीव घेतला असल्याचा आरोप करत इराणमधील महिला संतापाने पेटून उठल्या आहेत. देशभरात विविध ठिकाणी हिजाबविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

अग्रलेख : हिजाबची इराणी उठाठेव !

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणे मुस्लीम हिजाब नियमांनुसार दंडनीय गुन्हा आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून, राष्ट्रीयत्व किंवा धार्मिक श्रद्धेचा विचार न करता सर्व महिलांनी केस, डोके व मान झाकणारा हिजाब घालणे आवश्यक आहे. या नियमाचा इराणी महिलांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.