PM Modi in Garib Kalyan Sammelan Shimla : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमल्यामध्ये ‘गरीब कल्याण संमेलना’त सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली असून मोदी यावेळेस सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मात्र मोदींच्या यासभेसाठी शिमल्यामधील शाळाही बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिमल्यामध्ये मोदींच्या या कार्यक्रमानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आज सकाळपासूनच आंनदालय ते कॅनडी हाऊस दरम्यानचा रस्ता सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलाय. सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसपासून द मॉलमधील मदर्स चॉइस स्टोअरपर्यंत मोदींचा रोड शो सुद्धा आयोजित करण्यात आलाय. शहराला पोलीस छावणीचं स्वरुप आलं असून मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

शिमल्यामधील प्रशासनाने शाळांना उन्हाळी सुट्टी लांबवण्याचा सूचना केल्यात. या रॅलीला मोठ्याप्रमाणात गर्दी होणार असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे वाहतूककोंडी होणार आहे. म्हणूनच त्यात विद्यार्थ्यांच्या दळणवळणामुळे अधिक गोंधळ उडू नये म्हणून अप्रत्यक्षपणे शाळा बंद ठेवण्यास सांगण्यात आल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

मोदींच्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शिमल्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपाने भगवे ध्वज लावले आहेत. पंतप्रधान कार्यलायाने दिलेल्या माहितीनुसार सरकारी योजनांचा फायदा घेणाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून यासंर्भातील अभिप्राय घेण्यासंदर्भातील मोहिमेची ही सुरुवात आहे. शिमल्यातील भाजपा युवा मोर्चाचेच अध्यक्ष अमित ठाकूर यांनी या रॅलीसाठी २० हजार झेंडे, १७४ होर्डींग लावण्यात आलेत. तसेच यासंरर्भातील हजारो माहिती पत्रकं वाटण्यात आली आहेत. “मोदींच्या या सभेला ५० हजार लोक उपस्थिती लावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही शहरामध्ये वेगवेगळ्या १५ ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवल्या असून त्यावरुन मोदींचं भाषण लाइव्ह दाखवलं जाणार आहे,” असं ठाकूर म्हणालेत.

पंतप्रधान मोदींची ही रॅली सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. देशभरामधील राज्यांच्या राजधान्य, जिल्ह्याची केंद्र आणि कृषी केंद्रांमध्ये अशाप्रकारच्या रॅली घेतल्या जाणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलंय.

सकाळी १० वाजता देशभरामधील वेगवगेळ्या राज्यांमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, भाजपा खासदार, आमदारांच्या उपस्थित या कार्यक्रमाला देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये सुरुवात झालीय. हे नेते थेट लोकांशी संवाद साधणार असल्याचं भाजपाने सांगितलं आहे. ११ वाजता पंतप्रधान मोदी शिमल्यामधील कार्यक्रमातून यात सहभागी होतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50000 participants schools closed for mega rally pm modi garib kalyan sammelan in shimla scsg
First published on: 31-05-2022 at 11:09 IST