इंडोनेशियातील जांबी प्रांतात अजगराने चक्क ५२ वर्षीय महिलेला गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, महिला बेपत्ता असल्याने गावकरी तिचा शोध घेत होते. यावेळी त्यांनी संशय आल्याने अजगराला मारलं आणि त्याचं पोट कापून पाहिलं असता सगळ्यांनाच धक्का बसला. अजगराच्या पोटात महिलेचा मृतदेह सापडला.

सीएनएन इंडोनेशियाच्या वृत्तानुसार, महिला रविवारी संध्याकाळी कामावरुन परतत असताना बेपत्ता झाली होती. कुटुंबाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. दुसऱ्या दिवशी शोध घेत असताना पथकाला एक पोट फुगलेला अजगर दिसला आणि संशय आला.

हेही वाचा – IND vs PAK: मराठी तरुणांनी मेलबर्नच्या मैदानात झळकावलं अफजलखान वधाचं पोस्टर, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दणाणलं स्टेडियम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिकांना १६ फूट लांब अजगराने महिलेला गिळंकृत केल्याची शंका आली. त्यांनी अजगराला ठार मारुन त्यांचं पोट कापून पाहिलं असता महिलेचा मृतदेह सापडला. पोलीस प्रमुखांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महिला चहाच्या मळ्यात कामगार होती.

दरम्यान, इंडोनेशियात अजगराने अशाप्रकारे माणसाला गिळंकृत केल्याची ही दुर्मिळ घटना नाही. याआधीही अशा प्रकारची घटना घडली आहे. २०१८ मध्ये अजगराने एका महिलेला अशाच प्रकारे गिळंकृत केलं होतं.