संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या परिक्षकांच्या ज्युरीचं नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. ‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सुयश शिंदेच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मनं जिंकली असं म्हणायला हरकत नाही. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाला विशेष कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. नागराज मंजुळेंच्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

मराठी चित्रपट

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – म्होरक्या (मराठी चित्रपट)
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे
सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लघुपट) – पावसाचा निबंध – नागराज मंजुळे
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) – धप्पा – निपुण धर्माधिकारी

 

बॉलिवूडमधील पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- श्रीदेवी (मॉम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – दिव्या दत्ता (इरादा)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल – (बाहुबली 2)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लठ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान (मॉम)

 

इतर

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट- गाझी
सर्वोत्कृष्ट लद्दाखी चित्रपट- वॉकिंग विद द विंड
सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट- टू लेट
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट- मयूरक्षी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- हेब्बत रामाक्का
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- थोंडीमुथलम दृक्शियम
सर्वोत्कृष्ट ओरिया चित्रपट- हॅलो आर्सी
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- दह..
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- इशू

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65th national film awards bollywood and non bollywood in delhi shekhar kapur head jury complete winner list
First published on: 13-04-2018 at 12:12 IST