देशाचा ६७ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला चार खडे बोल सुनावले तसेच देशाच्या आर्थिक प्रगतीचाही आढावा घेतला.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा लहान मुलांच्या सहवासात साजरा केला.   बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पददलितांच्या वस्तीत जाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. आसाममध्ये ‘उल्फा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. पोलिसांनी राज्यात काही ठिकाणी ‘उल्फा’ संघटनेचे ध्वज जप्त केले.तामिळनाडू, ओदिशा, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.