उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला आहे. मुरादाबाद येथील दलपतपूर-काशीपूर महामार्गावर ट्रक आणि पीकअपमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भगतपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या खैरखाता गावाजवळ ट्रक आणि पीकअपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक पीकअपवर उलटून पडला. त्यामुळे पीकअपमधील नागरिक खाली दबले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीकअपमधील प्रवाशी एकाच कुटुंबातील असून, लग्नसमारंभासाठी जात होते. तेव्हा हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीकअप आणि ट्रकखाली अडकलेल्या प्रवाशांचं बचावकार्य करण्यात आलं.
हेही वाचा : VIDEO : कर्नाटकात राहुल गांधींचा हटके अंदाज, डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका
या घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, १५ पेक्षा अधिक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.