राजस्थानात एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळून ८ जण ठार झाले आहेत. तर ६ जण जखमी झाले आहेत.राजस्थानातील जोधपूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकलं आहे का याचाही शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत आणि जखमींना ४० हजारांची मदत जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानच्या जोधपूर शहरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका इमारतीचं बांधकाम सुरु होतं. बांधकाम सुरु असणाऱ्या या इमारतीची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना राजस्थान सरकारने प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 dead and 6 injured after a wall of an underconstruction building collapsed in basni industrial area in jodhpur today scj
First published on: 10-11-2020 at 22:58 IST