रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत तीन महिने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार आहे. त्यामुळे ८० करोड नागरिकांना याचा लाभ घेता येईल.

प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपणार आहे. ती आता डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी ४४ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ग्रामीण भागाला ७५ टक्के तर शहरी भागाला ५० टक्के मोफत धान्य दिलं जाणार आहे.”

हेही वाचा –

काय आहे योजना?

करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत आहे.