पत्नी सतत मोबाइलचा वापर करत असल्याने नाराज झालेल्या पतीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. आऱोपी पतीने पत्नीवर चाकूने वार केले. तसंच घटस्फोट देण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. छत्तीसगडमधील कानकेर येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने अनेकदा पत्नीकडे मोबाइलचा वापर कमी करावा यासाठी विनंती केली होती. पण पत्नीने मोबाइल वापरणं कमी केलं नाही. यामुळेच चिडलेल्या पतीने पत्नीवर चाकूने वार केले. आरोपी पतीने फक्त हल्ला केला नाही तर घटस्फोट देण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. पत्नी जर वारंवार आपला अपमान करणार असेल तर आपण आत्महत्या करु असं त्याने म्हटलं आहे.
पत्नीने केलेल्या दाव्यानुसार, घटनेच्या तीन दिवसांपुर्वी पतीचं आणि तिचं जोरदार भांडण झालं होतं. यावेळी त्याने मारहाणही केली होती. यानंतर तिने कानकेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी त्याने काही गोळ्या घेतल्या आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. जर आपले आदेश मानले नाहीत तर आपण तिला घटस्फोट देऊ असं आपल्या कुटुंबीयांना धमकावण्यात आल्याचंही पत्नीने सांगितलं आहे.
पत्नी क्षुल्लक कारणांवरुन आपल्याला सतत मारहाण करत असल्याचा महिलेचा आरोप आहे. यामुळे आपण सतत भीतीच्या छायेत जगत असल्याचं पत्नीचं म्हणणं आहे.