मध्य प्रदेशात एका महिलेने आपली जीभ कापून देवीला दान केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. गुड्डी तोमर असं या महिलेचं नाव असून ती दुर्गा मातेची भक्त आहे. जीभ कापल्यानंतर महिला बेशुद्ध पडली होती. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरसमा गावात ही घटना घडली आहे. गावात बिजासेन देवीचं मंदिर आहे. याच मंदिरात गुड्डी तोमर यांनी आपली जीभ कापून देवीला अर्पण केली अशी माहिती पोरसा पोलीस ठाण्याचे अधिकारी अतुल सिंग यांनी दिली आहे. महिला बेशुद्द पडल्यानंतर मंदिरात उपस्थित काही लोकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. महिलेने अंधश्रद्धेपायी हे पाऊल उचललं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलेचा पती रवी तोमर याने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून आपली पत्नी रोज सकाळी आणि संध्याकाळी बिजासेन मंदिरात दर्शनाला जाते. “आम्हाला तीन मुलं आहेत. माझी पत्नी दुर्गा मातेची भक्त आहे. काल संध्याकाळी अचानक तिने मंदिरात प्रार्थना करत असताना आपली जीभ कापून घेतली”, असं त्याने सांगितलं आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman cuts her tongue and offers in temple
First published on: 10-05-2018 at 16:39 IST