टोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने वार करुन खून, गुप्तांगही कापलं; महिलेने केले क्रूरकर्म पाहून पोलीसही चक्रावले | A woman killed husband over dark skin taunts in Chhattisgarh sgy 87 | Loksatta

टोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने वार करुन खून, गुप्तांगही कापलं; महिलेने केले क्रूरकर्म पाहून पोलीसही चक्रावले

पतीचा खून केल्यानंतर गावकऱ्यांसमोर बनाव, पोलीस चौकशीत कबूल केला गुन्हा

टोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने वार करुन खून, गुप्तांगही कापलं; महिलेने केले क्रूरकर्म पाहून पोलीसही चक्रावले
पतीचा खून केल्यानंतर गावकऱ्यांसमोर बनाव (प्रातिनिधिक फोटो)

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात महिलेने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती वारंवार काळ्या रंगावरुन टोमणे मारत असल्याने महिलेने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिला संगीता सोमवानीला अटक केली आहे.

प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पती पत्नीला नेहमी तिच्या काळ्या रंगावरुन टोमणे मारायचा. यावरुन दोघांमध्य़े अनेकदा भांडणदेखील झालं होतं. रविवारी रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सहनशक्ती संपलेल्या संगीताने कुऱ्हाडीने पतीनवर वार केला आणि जागेवरच ठार केल. यानंतर तिने पतीचं गुप्तांगही कापलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गावकऱ्यांची दिशाभूल कऱण्यासाठी महिलेने पतीची हत्या झाल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. मृताच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर संगीताने त्याच्याशी लग्न केलं होतं. महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बॉम्ब प्रशिक्षणाची कागदपत्र, रोख रक्कम, जीपीएस नेव्हिगेटर..PFI वरील छाप्यांमध्ये NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे!

संबंधित बातम्या

“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य
‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा
“तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?”; पटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांनी फटकारले
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हैद्राबादच्या निजामाची महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत