‘अतुल्य भारत’चा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून आमिर खानला हटविण्यात आल्यानंतर लगेचच त्याला रस्ते सुरक्षा अभियानातूनही वगळण्यात आले आहे. असहिष्णुतेबाबत केलेले वक्तव्य आमिरला महागात पडल्याचेच हे चित्र आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेवरून आमिरची डिसेंबर २०१४ रोजी रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली होती.
आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातील ‘रस्ते अपघात की खून?’ या प्रकरणात रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री गडकरी यांनी स्वत: आमिरशी संवाद साधला होता.
आमिरने या प्रकरणातून महत्त्वाचा सामाजिक विषय विस्तृतपणे मांडल्याचे सांगत गडकरी यांनी आमिरचे कौतुक केले होते.
यानंतर केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात करून आमिरची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आमिरला तडकाफडकी हटविण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2016 रोजी प्रकाशित
रस्ते सुरक्षा अभियानातूनही आमिर खानची गच्छंती
असहिष्णुतेबाबत केलेले वक्तव्य आमिरला महागात पडल्याचेच हे चित्र आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 11-01-2016 at 01:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan delete from road safety campaign