काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी निवडणूक लढवित असलेल्या रायबरेली मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश फक्रुद्दीन यांनी मंगळवारी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ‘आप’च्या उमेदवाराने अचानक घेतलेल्या माघारीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. फक्रुद्दीन यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. फक्रुद्दीन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याच्या वृत्ताला आपच्या नेत्यांकडूनही दुजोरा मिळाला आहे. आपण आगामी निवडणुकीसाठी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत फक्रुद्दीन यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अर्चना श्रीवास्तव यांना सोनिया गांधींविरोधात रायबरेलीतून उमेदवारी देण्याचा निर्णय आम आदमी पक्षाकडून घेण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
रायबरेली मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवाराची माघार
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी निवडणूक लढवित असलेल्या रायबरेली मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश फक्रुद्दीन यांनी मंगळवारी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
First published on: 08-04-2014 at 04:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap faces jolt candidate pitted against sonia pulls out from raebareli