आम आदमी पक्ष म्हणजे शहरी नक्षलवाद असल्याची टीका करणाऱया भाजप नेते अरुण जेटली यांच्यावर पलटवार करत भाजप मंत्री मानसिकदृष्या दिवाळखोरपणा करत आहेत त्यांची स्वत:चा इतिहास पहावा असे ‘आप’ने म्हटले आहे.
भाजप नेत्यांना आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी ते नक्की करावे आणि नंतर बोलावे असेही ‘आप’चे म्हणणे आहे. अरूण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना आम आदमीचे नेते संजय सिंह म्हणाले की, भाजप नेते मानसिकदृष्ट्या दिवाळखोर आहेत त्यांनी स्वत:चा इतिहासावर लक्ष टाकावे. त्यांनी १९७५ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने नक्षलवाद्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अरूण जेटलीही या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हिस्सा होते. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारात केवळ काँग्रेसचे हात काळे झालेले नाहीत भाजपचेही हात गैरव्यवहाराने रंगले आहेत असेही संजय सिंह म्हणाले.