देशात महिलांविरुद्ध अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मग तो लैंगिक असो अथवा घरगुती अत्याचार. मात्र, या अत्याचारांमधून लोकप्रतिनिधी सुद्धा सुटले नाही आहे. अशीच एक घटना पंजाबमध्ये समोर आली आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या महिला आमदाराला तिच्या पतीने मारहाण केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावरती व्हायरल झाला आहे.

बलजिंदर कौर असे मारहाण झालेल्या महिला आमदाराचं नाव आहे. त्या तलवांडी साबो या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. बलजिंदर कौर या चर्चा करताना या व्हिडिओत दिसत आहे. तेव्हाच त्यांच्या पतीने त्यांना मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडिओ पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरिंदर यांनी ट्विट केला आहे. त्या ट्विटवर ते लिह्तात, “आमदार बलजिंदर कौर यांना दिवसाढवळ्या मारहाण करण्यात आली, हे धक्कादायक आहे. पुरूषांची मानसिकता बदलावी लागेल. अन्य काही बदलण्यापूर्वी ही पुरूषप्रधान वृत्ती बदल्ली पाहिजे,” असे बरिंदर यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणाची पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी दखल घेतली आहेत. “मी समाजमाध्यमांवरती बलजिंदर कौर यांचा व्हिडिओ पाहिला. आम्ही या घटनेची स्वत:हून दखल घेतली आहे. नागरिकांच्या समस्या मांडणाऱ्या महिलेला घरातच छळाचा सामना करावा लागत आहे. हे अस्वस्थ करणार आहे,” असे मनीषा गुलाटी म्हणाल्या. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.