कुख्यात गुंड अबू सालेम याला २००१ मधील बनावट पासपोर्ट प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) दोषी ठरविले.
बनावट नावाने आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्याचा खोटो पत्ता देऊन अबू सालेम याने पासपोर्ट मिळविला होता. यावर न्यायालयाने सालेमला दोषी ठरविले. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सालेमला शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीवेळी सालेम न्यायालयात हजर नव्हता. सालेम सध्या ठाण्यातील कारागृहात जेरबंद आहे.